कान्स महोत्सवात ‘ऑपरेशन सिंदूर’चा संदेश!

78 व्या कान्स आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये सौंदर्यवती ऐश्वर्या राय-बच्चन पोहोचली. कान्सच्या रेड कार्पेटवर हिंदुस्थानी पेहरावात पोहोचलेल्या ऐश्वर्याने उपस्थितांना हात जोडून नमस्ते केले. हस्तीदंती बनारसी साडी, हस्तनिर्मित टिशू दुपट्टा आणि 500 कॅरेटपेक्षा जास्त माणिक, न कापलेल्या हिऱ्यांनी बनवलेला हार व आपल्या मनमोहक सौंदर्याने ऐश्वर्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. या वेळी तिच्या भांगेतील कुंकू खऱ्या अर्थाने चर्चेचा केंद्रबिंदू ठरले असून ऐश्वर्याने कान्सच्या रेड कार्पेटवरून ‘ऑपरेशन सिंदूर’चा संदेश दिल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.