ऑपरेशन थिएटरमध्ये भोजपुरी गाण्यांवर अश्लील नृत्य, व्हिडीओ व्हायरल

1125

अनेक रुग्णालये रुग्णांवरील इलाजांपेक्षा कधी कधी इतर प्रकारांमुळेच जास्त चर्चेत येतात. कधी रुग्णाच्या नातेवाईकांची मारहाण तर कधी आणखी काही. आता अशाच एका रुग्णालयात अश्लील नाच झाल्याचं उघड झालं आहे.

हे रुग्णालय बिहार येथील आरा जिल्ह्यातील आहे. या रुग्णालयात 24 तास रुग्णांना सेवा दिली जाते. तीन शिफ्टमध्ये डॉक्टर, कम्पाउन्डर, ड्रेसर, एएनएम, जीएनएम आणि वॉर्ड बॉय ड्युटीवर असतात. त्याखेरीज काही महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षारक्षकही तैनात असतात. असं असतानाही या रुग्णालयातील ऑपरेशन थिएटरमध्ये काही तरुण भोजपुरी गाण्यावर अश्लील नाच करतानाचा एका व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यातील एक तरुणाच्या हातात दारूची बाटलीही दिसत आहे.

व्हिडीओतील तरुण कंबरेवर आणि डोक्याला गमछा गुंडाळून अश्लील हातवारे करून नाचत आहेत. हा व्हिडीओ टिकटॉकसाठी बनवण्यात आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनावर प्रश्नचिन्ह उमटलं आहे. कारण, हे तरुण नेमके रुग्णालयाचे कर्मचारी आहेत किंवा नाहीत हे स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे या प्रकारावर संताप व्यक्त केला जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या