पंतप्रधानांनी शेतकऱ्यांसाठीही भावूक व्हावे, विरोधकांची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
pm-modi-crying-in-rajya-sabha

राज्यसभेत काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डोळ्यांत अश्रू आले. एका जुन्या आठवणीने ते भावनाविवश झाले, शेवटी तेसुद्धा माणूस आहेत. राज्यसभेत अश्रू ढाळणाऱया पंतप्रधानांनी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱया शेतकऱयांप्रति भावूकपणा दाखवावा, अशी मागणी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केली आहे.

राज्यसभेत भाषण करताना मोदी खरंच भावूक झाले की हा दिखाऊपणा होता, अशी चर्चा समाजमाध्यमांत सुरू झाली आहे. विरोधी पक्षात असताना महागाईच्या विरोधात भाजपकडून आंदोलनं केली जात होती. देशात पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसचे दर गगनाला भिडले आहेत याबद्दल मात्र, भाजप किंवा त्यांच्या पक्षाचे नेते काहीच बोलत नाहीत. लॉकडाऊन, नोटबंदीमुळे अनेकांचे रोजगार गेले. याबाबत पंतप्रधान मोदी पिंवा त्यांच्या पक्षाचे नेते कधीच भावूक झाल्याचे दिसत नाहीत, यावरून आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

मोदी सरकारने शेतकऱयांचे पाय अश्रूंनी धुवायला हवेत

भावनाविवश होण्यासारखे अनेक प्रसंग आज देशात घडत आहेत. शेतकरी आंदोलनात तर राज्यकर्त्यांच्या डोळ्यांतून अश्रूचा महापूर यावा अशी परिस्थिती आहे. केवळ मोदीच नव्हे, तर संपूर्ण सरकारनंच आपल्या अश्रूंनी शेतकऱयांचे पाय धुवायला हवेत. पण त्या आंदोलनाची थट्टा केली जातेय. – खासदार संजय राऊत, शिवसेना नेते

शेतकऱयांचे अश्रू दिसत नाहीत का?

राज्यसभेत पंतप्रधान मोदी यांच्या डोळ्यांत आलेले अश्रू मगरीचे आहेत. ज्यावेळी शेतकऱयांना दहशतवादी म्हणून जाहीर करून त्रास दिला, राकेश टिपैत यांच्या डोळ्यांत अश्रू आले, हे भाजपच्या नेत्यांना दिसले नाहीत का? सगळ्या गोष्टी देशातील लोक ओळखून आहेत. लोकशाहीमध्ये असा ड्रामा चालणार नाही. – नाना पटोले, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष

आता तरी तोडगा काढा

पंतप्रधान मोदी यांनी जो भावूकपणा काल संसदेत दाखवला, तोच भावूकपणा त्यांनी शेतकऱयांच्या बाबतीत दाखवला तर मनाला खूप समाधान मिळेल. तीन महिन्यांपासून हजारो शेतकरी न्याय्य हक्कांसाठी आंदोलन करत आहेत. दोन्ही बाजूंनी दोन-दोन पावलं मागे येऊन यावर तोडगा काढायला हवा. – अजित पवार, उपमुख्यमंत्री