60 वर्षांत लावली 30 हजार झाडे!, 72 वर्षांच्या निसर्ग शिक्षकाची साधना

ओडिशा येथील एका 72 वर्षीय वृद्धाने आपले जीवन हरित क्रांतीसाठी समर्पित केले आहे. नायगड जिह्यातील किंतिलो गावातील अंतर्ज्यामी साहू ऊर्फ गच्छा सर असे या ‘ट्री मॅन’चे नाव आहे. त्यांनी मागील 60 वर्षांमध्ये ओडिशात सार्वजनिक ठिकाणी 30 हजारपेक्षा जास्त झाडे लावली आहेत. आजच्या जागतिक निसर्ग संवर्धन  दिनानिमित्त साहू यांचे कौतुक होत आहे.

.साहू यांचा झाडांसोबतचा प्रवास ते शाळेत सहावीच्या वर्गात होते तेव्हापासून झाला. त्यांना निसर्गाची आवड आहे. झाडं लावणे म्हणजे निसर्गाची सेवा असल्याचे ते मानतात. साहू हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. मात्र या वयातही ते निसर्गप्रेम शिकवण्यासाठी शाळांना भेट देतात. ओडिशा सरकारने त्यांना ‘नेचर लव्हर’ हा पुरस्कार प्रदान केला आहे.

वन विभागाने साहूंनी केलेल्या सूचना नायगड वन विभागात लागू केल्या आहेत, अशी माहिती विभागीय वन अधिकारी एच.डी. धनराज हनुमंत्स यांनी दिली. झाडं लावणे, पर्यावरण संवर्धनाच्या मोहिमा राबवणे यासाठी गच्छा सर 100 टक्के प्रयत्न करतात. त्यांच्या सूचनांचे आम्ही पालन करतो, असे वन अधिकारी धनराज यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या