
ओटीटी प्लॅटफॉर्मवर दमदार एंट्री करणाऱ्या ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ने आपले गौरव गीत लॉन्च केले आहे. म… मनोरंजनाचा’ असे या गाण्याचे बोल असून प्लॅनेट मराठी ओटीटीच्या लोगोला अनुसरून हे बोल आहेत. मराठी सिनेसृष्टीतील तारेतारका या ‘प्लॅनेट मराठी’वर अवतारल्याने हे गाणे अधिकच बहारदार झाले आहे.
मराठी मनाला आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटावा, असे समीर सामंत यांचे गीतलेखन असून या गाण्याला कौशल इनामदार यांनी संगीत दिले आहे. तर या गाण्याला स्वप्निल बांदोडकर, आदर्श शिंदे, योगिता गोडबोले, वैशाली माडे यांनी स्वरबद्ध केले आहे. पुष्कर श्रोत्री यांचे दिग्दर्शन लाभलेल्या या गाण्यात अक्षय बर्दापूरकर, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, सचिन पिळगावकर, शरद केळकर, अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, तेजस्विनी पंडित, पुष्कर श्रोत्री, सुबोध भावे, मृण्मयी देशपांडे, प्रिया बापट, मृणाल कुलकर्णी, प्राजक्ता माळी, संजय जाधव, अभिजीत पानसे, प्रसाद ओक, जितेंद्र जोशी, आदिनाथ कोठारे, उर्मिला कोठारे, सोनाली खरे, भार्गवी चिरमुले, पर्ण पेठे, स्मिता तांबे, गायत्री दातार, अभिजीत खांडकेकर, सिद्धार्थ मेनन, भाग्यश्री मिलिंद, नेहा शितोळे, दीप्ती देवी, संदीप पाठक, निखिल चव्हाण, तेजस बर्वे, सुरभी हांडे, सुव्रत जोशी आणि शिवानी बावकर यांचा सहभाग आहे.
या गौरव गीताविषयी ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर सांगतात, ”प्रेक्षकांना सर्वोत्कृष्ट कन्टेन्ट देण्यासाठी आमचा सर्वोतोपरी प्रयत्न असेल. लवकरच नवनवीन कन्टेंट घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येऊ आणि आम्हाला आशा आहे हा मनोरंजनाचा खजिना तुम्हाला नक्कीच आवडेल.”
‘प्लॅनेट मराठी ओटीटी’च्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं घेऊन आलोय, मराठी कलाकारांनी सजलेलं #PlanetMarathi चं गौरव गीत!
पूर्ण व्हिडीओसाठी इथे क्लिक करा- https://t.co/32Ja5epPaH#म #PlanetMarathiAnthem #प्लॅनेटमराठीगौरवगीत #PlanetMarathiOTT #Anniversary #MarathiCelebrities #गौरवगीत pic.twitter.com/Blacn6YN2P
— Planet Marathi OTT (@PlanetMOTT) July 6, 2021




























































