पाकिस्तानातील 50 टक्के लोकांचे खायचे वांदे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद

कर्जाच्या बोझ्याखाली दबलेल्या व आर्थिकरित्या डबघाईला जात असलेल्या पाकिस्तानात दररोज तब्बल 50 टक्के कुटुंबांना फक्त एक वेळचं जेवण मिळत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे या 50 टक्के कुटुंबातील बहुतांश मुलं ही कुपोषित असल्याचे समजते.

पाकिस्तानात पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तरावर गरिबी व मुलांना मिळणाऱ्या आहाराबाबत राष्ट्रीय आरोग्य सेवा मंत्रायलाने सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सर्वेक्षणानुसार पाकिस्तानातील तब्बल 50 टक्के नागरिकांना त्यांच्या हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे दोन वेळचं पुरेसं जेवण देखील मिळत नाही. त्यामुळे तब्बल 40.2 टक्के लहान मुलं ही कुपोषित असून त्यांची वाढ खुंटली आहे.

पाकिस्तानात मुलांसोबत महिलांमध्ये देखील कुपोषणाचे प्रमाण जास्त आहे. बाळंतपणात महिलांना सकस आहार न मिळाल्याने तेथील महिलांच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होत असल्याचे समोर आले आहे.