ऑक्सफर्डच्या लसीचा इमर्जन्सीमध्ये वापर करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना लसीच्या वापराबाबत केंद्र सरकारने ठोस पाऊल उचलण्याची तयारी केली आहे. ऑक्सफर्डच्या लसीचा इमर्जन्सीमध्ये वापर करण्याबाबत पुण्याच्या सिरम इन्स्टिटय़ूटला मान्यता देण्याचा सरकारचा विचार आहे. अस्त्राझेनेकाच्या लसीचा इमर्जन्सीमध्ये वापर करण्यास यूके सरकारने मान्यता दिली तर हिंदुस्थानी नियामकालाही तशी संधी उपलब्ध असेल, असे नीती आयोगाचे सदस्य विनोद पॉल यांनी स्पष्ट केले.

पॉल हे कोरोना लस व्यवस्थापनासंदर्भात स्थापन केलेल्या नॅशनल एक्सपर्ट ग्रुपचे अध्यक्ष आहेत. ऑक्सफर्डच्या लसीचा आपत्कालीन परिस्थितीत वापर करण्यासाठी मान्यता देण्याचा विचार ‘इंडियन ड्रग रेग्युलेटर ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’कडून केला जात आहे. हिंदुस्थानात लसीची तिसऱया टप्प्यातील चाचणी पूर्ण होण्याआधी ही मान्यता दिली गेली तर प्राधान्य यादीतील आरोग्य सेवक व संबंधित इतरांना नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच लस देणे शक्य होईल, असेही पॉल म्हणाले.