सिंधूचा विक्रम, सिंगापूर ओपनचे जेतेपद पटकावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानची डबल ऑलिम्पिक पदक विजेती स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने सिंगापूर ओपनच्या अंतिम सामन्यात बाजी मारत यंदाच्या वर्षातील आपले तिसरे मोठे विजेतेपद पटकावले. तिने चीनच्या वांग झी यीला पराभूत करत सिंगापूर ओपनच्या पदकावर आपले नाव कोरले. पी. व्ही. सिंधूने रविवारी पार पडलेल्या ‘सिंगापूर ओपन 2022’ मधील महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात चीनच्या वांग झी यीचा 21-9, 11-21, 21-15 असा पराभव केला.

ही  स्पर्धा जिंकणारी ती तिसरी हिंदुस्थानी बॅडमिंटनपटू ठरली आहे. यापूर्वी 2010 मध्ये सायना नेहवालने तर 2017 मध्ये साई प्रणीतने सिंगापूर ओपन जिंकण्याचा पराक्रम केला होता. आपल्या आजच्या विक्रमी कामगिरीमुळे सिंधूने देशाचे नाव अभिमानाने उंचावले आहे.