दुर्गामातेला सोन्याची साडी अन् डोळे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजेला विशेष महत्त्व आहे. हा उत्सव बघण्यासाठी देशभरातून भाविक पश्चिम बंगाल गाठतात. तेथील दुर्गापूजा आणि नवरात्रोत्सवात पारंपरिकता आणि नवतेचे अनोखे दर्शन होते. कोलकात्याच्या बागुईती येथील बंधू महल क्लबच्या उत्सवात दुर्गामातेच्या मूर्तीला सोनेरी डिझायनर साडी परिधान करण्यात आली आहे. तसेच मूर्तीचे डोळेदेखील सोन्याचे आहेत. आयोजक कार्तिक घोष यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्गामातेच्या साडीमध्ये सहा ग्रॅम सोन्याचा वापर करण्यात आला आहे. साडीची किंमत अंदाजे दीड लाख रुपये आहे. तसेच मूर्तीचे डोळे 10 ग्रॅम सोन्यापासून बनवले आहेत. नवरात्रोत्सवावर यंदाही कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे सर्व नियमांचे पालन करून उत्सव साजरा केला जात आहे.