
कर्जतचे चित्रकार पराग बोरसे यांच्या चित्राला अमेरिकेतील पेस्टल सोसायटी ऑफ वेस्ट कोस्ट या नामांकित संस्थेचा पुरस्कार मिळाला आहे. पेस्टल्स यूएसए या 35 व्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात पराग बोरसे यांनी कांस्य पुरस्कार पटकावला आहे.
प्रदर्शनासाठी जगभरातून आलेल्या हजारो चित्रांपैकी सॉफ्ट पेस्टस माध्यमातील 99 चित्रे निवडण्यात आली. पराग बोरसे यांचे ‘ग्रेसफुल ऑपिएरन्स’ असे शीर्षक असलेले मेंढपाळाचे पोट्रेट निवडण्यात आले. उन्हातान्हात राबणाऱया कष्टकरी माणसाचा हा चेहरा आहे. या माणसाच्या चेहऱयावरील रापलेली त्वचा आणि त्याच्या नजरेतील भेदकता अवर्णनीय आहे.
– एकूण 22 देशांतील चित्रांचा प्रदर्शनात सहभाग होता. हिंदुस्थानातून निवडलेले पराग बोरसे हे एकमेव चित्रकार आहेत. कोरोनामुळे गेली दोन वर्षे प्रदर्शन ऑनलाईन स्वरूपात होत आहे. 2018 मध्ये या संस्थेने बोरसे यांना साऊथ वेस्ट आर्ट मॅग्झिन हा पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.
– बोरसे यांना याआधी पेस्टल जनरल मॅक्झिन अमेरिका, इंटरनॅशनल आर्टिस्ट मॅक्झिन ऑस्ट्रेलिया अशा आंतरराष्ट्रीय संस्थांचे पुरस्कार मिळालेले आहेत.





























































