पाकिस्तानमध्ये रहिवासी भागात कोसळले हवाई दलाचे विमान, 19 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पाकिस्तानच्या हवाई दलाचे विमान एका रहिवासी भागात कोसळले. या अपघातात 5 कर्मचार्‍यांसह 19 जणांचा मृत्यू झाला आहे.

मंगळवारी रावळपिंडीच्या रहिवासी भागात सकाळी हवाई दलाचे विमान कोसळले. हा अपघात इतका भीषण होता की त्यात पाच कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला. तसेच 14 सामान्य नागरिकांचाही मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जवळच्या इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. सदर विमान प्रशिक्षणासाठी उडवण्यात आले होते. जखमींची प्रकृती गंभीर आहे. मृतांचा आकडा वाढू शकतो अशी भिती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.