शिया असल्याने कॅच सोडला! हिंदुस्थानी बायकोला शिव्या, हसन अलीविरोधात ट्रोलर्सनी ओकली गरळ

T20 विश्वचषक स्पर्धेचा उपांत्यपूर्व सामना पाकिस्तान सहजपणे जिंकणार असं वाटत असताना मॅथ्यू वेडने झंझावाती आणि स्फोटक फलंदाजी करत सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूने फिरवला होता. पाकिस्तानचा क्रिकेटपटू हसन अली याने वेड याचा कॅच सोडला ज्यानंतर वेडने तीन सिक्स मारत ऑस्ट्रेलियाला अंतिम फेरीत पोहचवलं. वेडचा हसन अली याने कॅच सोडल्याने पाकिस्तान हरली असं पाकिस्तानातील काही क्रिकेटप्रेमींना वाटत असून त्यांनी हसन अलीला ट्रोल करायला सुरुवात केली. ट्रोलर्सची पातळी इतकी घसरली की त्यांनी त्याच्या बायकोवरही घाणेरड्या शब्दात चिखलफेक केली कारण हसन अली याची बायको सामिया आरझू ही हिंदुस्थानी आहे.

आजोबांनी बलात्कार केल्याने 11 वर्षांची मुलगी गर्भवती झाली

hasan-ali

hasan-ali2

इन्स्टाग्रामवर हसन अली आणि त्याची बायको सामिया आरझू यांच्या अकाऊंटवर जाऊन ट्रोलर्सनी यथेच्छ गरळ ओकली आहे. काहींनी हसन अलीला विचारलंय की धावा देण्यासाठी त्याला किती पैसे मिळाले, तर काहींनी त्याला गद्दार म्हटले आहे.

एक्झॉस्ट पाईपमध्ये डोकं घुसवलं, तरुणीची बोंबाबोब

hasan-ali4

हसनची बायको सामिया आरझू हिच्याबद्दलही ट्रोलर्सनी अपशब्द वापरले आहेत. एका ट्रोलरने तर हसन अली पाकिस्तानात येताच त्याला गोळी घातली पाहीजे अशी प्रतिक्रिया दिली आहे.

hasan-ali3

hasan-ali4

पाकिस्तानविरूद्ध हिंदुस्थानी संघाला या विश्वचषक स्पर्धेत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर मोहम्मद शमी याच्याविरोधातही वाईट-साईट लिहिण्यात आलं होतं. शमी हा गद्दार असल्याचं ट्रोलर्सनी म्हटलं होतं. नंतर कळालं की त्याच्याविरोधात ही मोहीम पाकिस्तानातूनच चालवली गेली होती.

शमीविरोधात वाईट-साईट लिहिलं जात असताना हिंदुस्थानचे बहुतांश माजी क्रिकेटपटू त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते. हसन अलीच्या बाबतीत मात्र असं घडताना दिसत नाहीये. असं असलं तरी काही हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींनी मात्र हसन अलीला पाठिंबा दर्शवणाऱ्या पोस्ट केल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला धूळ चारली; 5 विकेटने विजय मिळवत अंतिम फेरीत धडक

टी-20 विश्वचषकाच्या दुसऱ्या रोमहर्षक उपांत्य सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर पाच विकेट आणि 6 चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला. डेव्हिड वॉर्नर, मर्क्यूस स्टॉयनीस, मॅथ्यू वेड यांनी केलेल्या तुफानी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने विश्वचषकात पाकला पराभवाची धूळ चारत अंतिम सामन्यात धडक मारली. दुबईच्या मैदानात आज चौकार, षटकारांचा पाऊस पडला. आता येत्या रविवारी ऑस्ट्रेलिया विजेतेपदासाठी न्यूझीलंडला भिडणार आहे. 17 चेंडूंत 41 धावांची नाबाद धडाकेबाज खेळी करून कांगारूंना विजय मिळवून देणारा मॅथ्यू वेड या लढतीचा ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरला.

नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम पाकिस्तानला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सलामीवीर बाबर आझम आणि मोहंमद रिझवान यांनी पाकिस्तानला दणदणीत सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या गडय़ासाठी 71 धावांची भागीदारी केली. मोहंमद रिझवान याने 52 चेंडूंत तीन चौकार, चार षटकारांच्या जोरावर 67 धावा केल्या. तर बाबरने 34 चेंडूंत पाच चौकारांच्या मदतीने 39 धावा केल्या. त्यानंतर मैदानात उतरलेल्या फकर झमानने कमाल करत 32 चेंडूंत तीन चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने नाबाद 55 धावा करत पाकिस्तानची धावसंध्या 176 पर्यंत पोहचवली.

विजयासाठीचे 177 धावांचे आव्हान कांगारुनी 19 षटकातच पाच विकेटच्या मोबदल्यात पार केले. डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी 51 धावांची सलाम दिली. त्यानंतर मर्क्यूस स्टॉयनीस आणि मॅथ्यू वेड यांनी कमालीची तुफानी फलंदाजी करत पाकिस्तानच्या घशातून विजय खेचून आणला. स्टॉयनीसने 31 चेंडूमध्ये दोन चौकार, दोन षटकारांच्या मदतीने 40 धावा केल्या. तर वेडने 17 चेंडूत दोन चौकार, चार षटकारांच्या मदतीने 41 धावा ठोकत ऑस्ट्रेलियाचा विजय सोपा केला. 19 व्या षटकामध्ये वेडने शाहीन शाह आफ्रिदीला सणसणीत तीन षटकार लगावत विश्वचषकातील पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात आणले.