जम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । जम्मू

पाकिस्तानने आज सकाळी जम्मू कश्मीरमधील पूँछ जिल्ह्यातील सीमा रेषेवर गोळीबार करत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ शांतता होती मात्र आज पुन्हा एकदा गोळीबार करत पाकिस्तानन्या कुरघोड्या करण्यास सुरुवात केली. हिंदुस्थानी लष्कर देखील पाकिस्तानच्या गोळीबारला चोख प्रत्युत्तर देत आहे.

याआधी 7 जानेवारीला पाकिस्तानने पूँछ जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गोळीबार करत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. त्यावेळी सलग तीन दिवस पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला होता.