पंढरपूर तालुका 22 महिन्यांनंतर कोरोनामुक्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंढरपूर तालुका 22 महिन्यांनंतर आज कोरोनामुक्त झाला आहे. आज आलेल्या अहवालात पंढरपूर तालुक्यात एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. तसेच ज्या 2 रुग्णांवर उपचार सुरू होते, ते कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज पंढरपूर तालुक्यात नवीन तसेच उपचार सुरू असलेला एकही रुग्ण नाही. खऱ्या अर्थाने 22 महिन्यांनी पंढरपूर तालुका कोरोनामुक्त झाला आहे.

कोरोनामुळे दोन वर्षांत 2 आषाढी यात्रा, 2 चैत्री आणि माघी, तर 1 कार्तिकी यात्रा झालेली नाही. 22 महिन्यांच्या काळात कोरोनामुळे विद्यमान आमदार भारत भालके, माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, राजूबापू पाटील, ह.भ.प. रामदास महाराज जाधव, ह.भ.प. वा. ना. महाराज उत्पात यांचा मृत्यू झाला आहे.