
परब मराठा समाज, मुंबई या संस्थेच्या अध्यक्षपदी राज्याचे परिवहन व सांस्कृतिक कार्यमंत्री आणि सिंधुदुर्ग जिह्याचे सुपुत्र अॅड. अनिल परब यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर यावेळी इतर कार्यकारिणीदेखील जाहीर करण्यात आली असून उपाध्यक्षपदी दीपक परब आणि कार्याध्यक्षपदी जगदीश परब यांची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
यावेळी जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारिणीत सरचिटणीसपदी जी. एस. परब यांची तर चिटणीसपदी प्रमोद परब आणि शैलेंद्र परब यांची निवड करण्यात आली आहे. तर कोषाध्यक्ष पदावर शरद परब यांना संधी देण्यात आली आहे. तर सदस्यपदी आत्माराम परब, सोमा परब, संतोष परब, सुनील परब, श्रीकांत परब, प्रतीक्षा परब, अभय परब, अशोक परब, मिलिंद प्रभू, सत्यवान परब, सुप्रिया परब, प्रवीण परब, आशीष परब यांची निवड करण्यात आली आहे. तर अंतर्गत हिशेब तपासनीस म्हणून सुदाम परब आणि सल्लागारपदी इंडियन ऑर्थोपेडिक असोसिएशन आणि आशिया पॅसिफिक आर्थोपेडिक असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. राम प्रभू, प्रकाश परब, अशोक परब, सत्यवान परब यांची निवड करण्यात आली आहे.
























































