
परळी वैजनाथ – परळी तालुक्यातील नागापूर कॅम्प येथे मामानेच भाच्याचा गळा कापून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. केज येथे राहणारी बहिण तिच्या आई व भावाला भेटण्यासाठी आली असता ते सगळे शनिवारी रात्री घरातील सर्वजण एकत्र जेवण करून झोपले.
सर्वजण झोपेत असताना चार वर्ष चिमुकल्याच्या गळ्यावर व मानेवर वार करून खून केलाची घटना आज रविवारी रोजी सकाळी उघडकीस आली आहे.कार्तिक करंजकर (4)असे मयत मुलाचे नाव आहे.
केज तालुक्यातील लाडेगाव येथील सुरेखा करंजकर या परळी तालुक्यात तीन दिवसांपूर्वी आई व भावाला भेटण्यासाठी नागापूर कॅम्पमध्ये आल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांचा चार वर्षांचा मुलगा कार्तिकही होता. संशयित आरोपी शहानिक लक्ष्मण चिमनकर (27) हा त्याच्या आईला त्रास देत होता तसेच सुरेखा त्याला समजावण्यासाठी घरी आली होती.
शनिवारी रात्री त्याला समजावत असताना दोन भावंडांमध्ये वाद झाला. त्यावरून आरोपींनी हत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेनंतर अप्पर पोलीस अधीक्षक नेरकर यांनी घटनास्थळी भेट दिली.






























































