भाजप नेत्यांनी घेतला काळ्या शाईचा धसका! बावनकुळेंच्या पत्रकार परिषदेपूर्वी पत्रकारांची तपासणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महात्मा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पुणे येथे शाईफेक करण्यात आली.

या घटनेचा भाजप नेत्यांनी धसका घेतला आहे. मंगळवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहणाऱ्या पत्रकारांची पत्रकार परिषदेआधी तपासणी करण्यात आली.

चंद्रकांत पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर संपूर्ण राज्यात तीव्र पडसाद उमटले आहेत. चंद्रकांत पाटील हे पुणे दौऱ्यावर असताना त्यांच्या अंगावर शाई फेकून निषेध केला होता. या प्रकरणाचा भाजपा नेत्यांना चांगलाच धसका घेतला असल्याचा प्रत्यय परभणीमध्ये आला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे परभणी दौऱ्यावर असून ते पत्रकारांची परभणी शहरातील एका हॉटेलमध्ये संवाद साधला.

मात्र, या पत्रकार परिषदेला उपस्थित राहणाऱ्या पत्रकारांची तपासणी केल्यानंतरच पोलिसांनी पत्रकारांना आतमध्ये सोडले. पत्रकारांकडे कोणत्या रंगाच्या शाईचं पेन आहे याची तपासणी देखील करण्यात आली. तर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहणाऱ्या आमदारांसोबत आलेल्या पदाधिकाऱ्यांची देखील तपासणी केल्यानंतर त्यांना आतमध्ये प्रवेश देण्यात आला. महाराष्ट्र टाइम्सने यासंबंधीचं वृत्त दिलं आहे.