
हेराफेरी-3 साठी बाबू भैया ऊर्फ परेश रावल हे या चित्रपटातून बाहेर पडले असून त्यांनी याआधी 11 लाख रुपयांची घेतलेली सायनिंग अमाउंटसुद्धा चित्रपट निर्मात्याला परत केल्याची माहिती समोरआली आहे. या चित्रपटासाठी परेश रावल यांना एकूण 15 कोटी रुपये फी मिळणार होती. चित्रपट निर्मात्याने 11 लाख रुपये सायनिंग अमाउंट दिली होती. बाकीचे 14 कोटी 89 लाख रुपये चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मिळणार होते. परंतु, ही अट परेश रावल यांना पसंत न पडल्याने त्यांनी या चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे, असे बोलले जात आहे. दरम्यान, परेश रावल यांनी चित्रपटातून बाहेर पडल्याची घोषणा केल्यानंतर चित्रपट निर्मात्याला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे त्यांनी परेश रावल यांना नोटीस पाठवली होती.