माजी मिस इंडिया-युनिव्हर्सवर Porn चित्रपटात काम केल्याचा आरोप, आरोप खोटे असल्याचा मॉडेलचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

झारखंडमधील धनबादचं नावही राज कुंद्रा याच्या अश्लील उद्योग कंपनीसोबत चर्चिलं जाऊ लागलं आहे. इथे मिस इंडिया-युनिव्हर्सचा खिताब पटकावणारी परी पासवान राहते. परी उर्फ प्रियंका पासवान हिने राज कुंद्राच्या Porn चित्रपटात काम केल्याचा तिच्यावर आरोप करण्यात आला आहे. हा आरोप तिच्या सासरच्यांनी केल्याने या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं आहे. परीने आपल्यावर लावलेले आरोप खोटे असून हुंड्यासाठी सासरची मंडळी आपला छळ करून आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करत असल्याचं तिचं म्हणणं आहे.

136948668_2840550362885913_7408064075590419857_n

2019 साली झालेल्या मिस इंडिया स्पर्धेची परी पासवान ही विजेती ठरली होती. 2021 मध्ये तिने नीरज कुमार नावाच्या तरुणाशी लग्न केलं होतं. या दोघांची ओळख फेसबुकवर झाली होती. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये भांडणं होत असून ही भांडणं विकोपाला पोहोचली आहेत. परीने नीरजविरोधात पोलिसांत तक्रार करून तिला अटक करवली आहे. यानंतर नीरजच्या आईवडिलांनी परीवर गंभीर आरोप केले आहेत. नीरजला धमकावून परीने जबरदस्तीने त्याच्याशी लग्न केल्याचा नीरजच्या आईवडिलांनी आरोप केला आहे. परीने पॉर्न चित्रपटात काम केल्याचाही नीरजच्या आईवडिलांनी आरोप केला आहे.

138333644_5332435883441065_4800234465840114330_n

परी पासवान हिने एक पत्रकार परिषद बोलावली होती. या पत्रकार परिषदेत तिने सासरच्यांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिले. पॉर्न चित्रपटात काम केल्याच्या आरोपाबाबत बोलताना ती म्हणाली की ती एक मॉडेल असल्याने कामाच्या शोधात ती मुंबईला आली होती आणि या कामाच्या बहाण्याने तिचा पॉर्न व्हिडीओ चित्रीत करण्यात आला. आपल्याला कोल्डड्रींकमध्ये गुंगीचं औषध पाजण्यात आलं आणि त्यानंतर आपला व्हिडीओ चित्रीत करण्यात आला असं परीचं म्हणणं आहे. या प्रकरणी आपण मुंबई पोलिसांत तक्रारही नोंदवली असून या प्रकाराबाबत आपण नीरजला सांगितलं होतं असं परीचं म्हणणं आहे.

137275767_738078880159466_8639046503683848126_n
परीच्या सासरच्यांनी तिच्यावर पुन्हा आरोप करताना म्हटलंय की नीजरशी लग्न करण्यापूर्वी तिची 2 लग्न झाली होती. ती तरुणांची आयुष्ये उध्वस्त करत असल्याचं नीरजच्या आईवडिलांनी म्हटलंय. परीला 12 वर्षांची एक मुलगी असून तिचा नवरा आजही घरी येऊन मुलीसोबत खेळतो असं परीच्या सासरच्यांनी म्हटलंय. यावर परीने स्पष्टीकरण देताना म्हटलंय की ही बाब नीरज याला माहिती होती आणि आपण त्याच्यापासून आधीच्या लग्नाबद्दल काहीही लपवून ठेवलं नव्हतं.