संसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

संसदेचे यंदाचे हिवाळी अधिवेशन येत्या 11 डिसेम्बर 2018 ते 8 जानेवारी 2019 या कालावधीत पार पडणार आहे . संसदीय कामकाज केंद्रीय समितीने( सीसीपीए ) बुधवारी या अधिवेशनाचा कालावधी जाहीर केला.सलग दुसऱ्या वर्षी हे अधिवेशन डिसेंबरमध्ये सुरु होणार आहे.

नेहमीच्या परंपरेनुसार संसदेचे हिवाळी अधिवेशन नोव्हेंबर महिन्यात पार पडते. पण पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे यंदा संसद अधिवेशन उशिराने घेतले जाणार आहे. राजस्थान ,मध्य प्रदेश ,तेलंगणा ,मिझोराम आणि छत्तीसगढ या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात पार पडणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखालील संसदीय कामकाज केंद्रीय समितीने हिवाळी अधिवेशनाचा हा कार्यक्रम घोषित केला.