पश्चिम महाराष्ट्र कोळी महासंघ प्रमुख अरुण कोळी शिवसेनेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम महाराष्ट्र कोळी महासंघ प्रमुख अरुण (भाऊ) कोळी यांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश केला.

अरुण कोळी यांच्यासह अनिल बेळके (युवा अध्यक्ष, सोलापूर जिल्हा), विश्वनाथ प्यारी (विद्यार्थी संघटना, जिल्हा अध्यक्ष, सोलापूर), अजय माने (वाल्गिडी संघ जिल्हा अध्यक्ष), दशरथ पायरूट (युवक जिल्हा उपाध्यक्ष, वडार समाज), बसवराज कोळी (शहर कार्याध्यक्ष, कोळी महासंघ), अंबाण्णा कोळी (विडी कामगार), बसवराज ह. कोळी (अक्कलकोट तालुका संपर्कप्रमुख), सागर लोणारी (संस्थापक अध्यक्ष – अरुणभाऊ लोणारी मित्र परिवार सामाजिक संस्था), कुल्लाप्पा कोळी (प्रसिद्धी प्रमुख), सुभाष कोळी (शाखाप्रमुख), नीलेश सोहर (गटप्रमुख), राय घ्याल (प्रसिद्धी प्रमुख), जगदीश प्रजापती (शहर अध्यक्ष), सुनील पाटील (प्रसिद्धी प्रमुख) तसेच इतर समाज बांधव यांनीही या वेळी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत, सोलापूर संपर्कप्रमुख अनिल कोकीळ उपस्थित होते.