प्रवाशांनो, विमान उड्डाणाच्या साडेतीन तास आधी विमानतळावर पोहोचा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाताळच्या सुट्टीत अनेक जण सहकुटुंब देशांतर्गत किंवा देशाबाहेर फिरण्याचे प्लॅन आखतात. वर्षखेरीस मुंबई विमानतळावर होणारी गर्दी लक्षात घेता मुंबई विमानतळ प्रशासनाने नव्या गाईडलाईन जारी केल्या आहेत. त्यानुसार प्रवाशांना आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी किमान साडेतीन तास आधी तर देशांतर्गत प्रवासासाठी किमान अडीच तास आधी विमानतळावर पोहोचणे बंधनकारक असणार आहे.

विमानतळावर होणारी प्रवाशांची गर्दी आणि एअर ट्रफिकचा पेंद्रीय हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आढावा घेतला. या वेळी त्यांनी देशातील सर्व प्रमुख विमानतळांवर सुरक्षा क्षमतेनुसार महत्त्वाच्या उड्डाणकाळांचे नियोजन करण्यासंदर्भात आराखडा तयार करण्याच्या सूचना अधिकाऱयांना दिल्या. याशिवाय प्रवाशी सामानाची तपासणी करणाऱया मशीनबाबत आढावा घेण्याचेही सांगण्यात आले.

विमान वाहतूक आणि विमानतळांवरील समस्यांबाबत शिंदे यांनी नुकतीच लोकसभेत माहिती दिली. इमिग्रेशन, विमानतळांची सुरक्षा बघणारे पेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि इतर संबंधित यंत्रणांबरोबर मी चर्चा केली असून विमानांचे आगमन आणि उड्डाणांचे बारकाईने नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती शिंदे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.