
आयुक्तालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या पोलीस शिल्ड क्रिकेट स्पर्धेत पय्याडे स्पोर्टिंग क्लबने क्रिकेट क्लब ऑफ इंडियाला पराभूत करीत अजिंक्यपदावर नाव कोरले. हे त्यांचे तिसरे जेतेपद ठरले हे विशेष. हिंदुस्थानचे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते विजेत्यांना गौरवण्यात आले. पय्याडे स्पोर्टिंग क्लबला यावेळी एक लाख रुपये बक्षिसाच्या रूपात देण्यात आले. पय्याडेचे डॉ. पी. व्ही. शेट्टी यांनी ही रक्कम क्रिकेट प्रशिक्षक विद्याधर पराडकर यांच्या उपचारासाठी प्रदान केली.
संक्षिप्त धावफलक ः क्रिकेट क्लब ऑफ इंडिया – 45 षटकांमध्ये 9 बाद 216 पराभूत वि. पय्याडे स्पोर्टिंग क्लब – 37 षटकांमध्ये 5 बाद 218.
























































