पेणमध्ये ५० वर्षीय लिंगपिसाटाचे चिमुरडीबरोबर अश्लिल चाळे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी। पेण

पेण शहरांत माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली असून एका ४ वर्षाच्या चिमुरडीबरोबर अश्लिल चाळे करणाऱ्या ५० वर्षीय इसमास अटक करण्यात आली आहे. चंद्रकांत चौधरी असे या नराधमाचे नाव आहे.

शहरातील नवीन वसाहत, फणसडोंगरी येथे तो राहतो. तर पीडित मुलगी त्याच्या शेजारी राहते. यामुळे मुलीच्या घरातले त्याला ओळखत होते. याचाच गैरफायदा घेत बुधवारी त्याने नातवासोबत खेळायला नेतो म्हणून पीडितेला आपल्यासोबत नेले. त्यानंतर त्याने घराशेजारील एका पडक्या घराबाहेरील झाडाजवळ तिला नेले व तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.

हा प्रकार समजताच पेण शहर व तालुक्यात संतापाची लाट उसळली असून या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात येत आहे. तसेच महिला अत्याचार विरोधी मंचाच्या अध्यक्षा वैशाली पाटील यांनीही या प्रकरणी लक्ष घालून सदर प्रकरणातील आरोपीस तातडीने अटक करावी अशी मागणी करत पीडित मुलीला न्याय मिळवून देणार असल्याचे बोलताना सांगितले.

या प्रकरणाची पोलीसांनी गंभीर दखल घेत चंद्रकांत चौधरी याला अटक केली असून त्याच्या विरुध्द भा.दं. वि. कलम ३७६ (२), २०१२ चे कलम ३, ४, ५ ( म ) व ६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. त्याला न्यालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने ७ जूलै पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.