
गुप्तांगात पेन्सिल सेल अडकल्याने एका माणसावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. या सेलमुळे त्याच्या अवयवांचं बरंच नुकसान झालं असून आता त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
डेली स्टार युकेने यासंबंधीचं वृत्त दिलं आहे. एका 49 वर्षांच्या माणसाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याला मूत्रमार्गाचा संसर्ग झाल्याने त्याच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याला लघवी करताना अडथळा निर्माण झाला होता. अडथळा निर्माण करणारा संसर्ग झाल्याने त्याला वेदना होत होत्या. पण, वास्तविक पाच महिन्यांपूर्वी त्याने केलेल्या एका भलत्या प्रयोगामुळे त्याच्यावर ही वेळ येऊन ठेपली.
या शस्त्रक्रियेच्या पाच महिन्यांआधी त्याने एक प्रयोग केला होता. त्याने पेन्सिल आकाराची सेल त्याच्या गुप्तांगात घातली होती. ती जवळपास 24 तास तशीच त्याच्या गुप्तांगात होती. त्यानंतर त्याला त्रास झाल्याने तो रुग्णालयात दाखल झाला होता. रुग्णालयाने एक्स रेच्या साहाय्याने ती सेल शोधून शस्त्रक्रिया न करता काढून टाकण्यात आली होती.
मात्र, जवळपास 24 तास ती सेल त्याच्या गुप्तांगात राहिली. त्या सेलच्या धातूंमुळे त्याच्या मूत्रवहन करणाऱ्या नलिकांना अडथळा निर्माण करणारा संसर्ग झाला होता. त्यानंतर जवळपास पाच महिन्यांनी त्याला खूप त्रास झाल्यानतंर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.


























































