अमेरिकेत पुन्हा हिंसाचाराची भीती; जो बायडन यांच्या शपथविधीमध्ये हल्ल्याची शक्यता

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष बुधवारी 20 जानेवारीला पदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या या शपथविधी सोहळ्यात हल्ला होण्याची शक्यता सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या कॅपिटोल हॉलवर ट्रम्प समर्थकांनी धडक दिली होती. त्यावेळी हिंसाचार उफाळला होता. त्यामुळे वॉशिंग्टनमध्ये कर्फ्यू लावण्यात आला होता. आता अमेरिकेत पुन्हा हिंसाचार होण्याची भीती सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केली आहे.

जो बायडेन यांच्या शपथविधीदरम्यान काही हल्लेखोर हल्ला करण्याची शक्यता आहे. बायडन यांच्या सुरक्षा यंत्रणेतील एखादी व्यक्ती किंवा समारंभाला उपस्थित असलेल्यांपैकी काहीजण हल्ला करण्याची शक्यता असल्याचे सुरक्षा यंत्रणांनी म्हटले आहे. त्यामुळे हा समारंभ शांततेत पार पाडण्यासाठी आणि बायडन यांच्या सुरक्षेसाठी योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.

समारंभाला असलेला धोका लक्षात घेत एफबीआयने वॉशिंग्टनला येणाऱ्या 25 हजार जवानांची विशेष तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. डेली मेलने याबाबतचे वृत्त दिले आहे. 6 जानेवारीला अमेरिकेच्या संसदेवर ट्रम्प समर्थकांनी हल्ला केला होता. त्यावेळी झालेल्या हिंसाचारात 5 जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर अमेरिकेत पुन्हा एकदा हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

वॉशिंग्टन शहराच्या सुरक्षेसाठी आणि बायडन यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या व्यक्तींकडूनच हल्ल्याची शक्यता असल्याचे सुरक्षा यंत्रणेने म्हटले आहे. या हल्ल्यातून बायडन आणि इतर महत्त्वाच्या व्यक्तींना धोका असल्याचे सुरक्षा यंत्रणांनी म्हटले आहे. सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केलेल्या या इशाऱ्यानंतर समारंभासाठी अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. तसेच योग्य ती खबरदारी घेण्यात येत असल्याचे सुरक्षा यंत्रणांनी म्हटले आहे.

जो बायडन यांच्या शपथविधी सोहळ्याला हल्ला होणार असल्याची शक्यता आहे. याबाबत ठोस पुरावे हाती लागलेले नाहीत. मात्र, सध्याची परिस्थिती लक्षात घेता हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जो बायडन आणि इतर प्रमुख व्यक्तींच्या सुरक्षेसाठी योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. तसेच तैनात करण्यात आलेल्या सर्व सुरक्षा रक्षकांची तपासणी करण्यात येणार आहे, असे आर्मी सेक्रेटरी रयान मॅकर्थी यांनी सांगितले.

सुरक्षेसाठी तैनात जवानांची तपासणी करण्यासह अधिकाऱ्यांनी विशेष प्रशिक्षणही देण्यात येत आहे, समारंभाच्या ठिकाणी असलेला धोका आणि संशयास्पद व्यक्तींना ओळखणे. तसेच एखादी अप्रिय घटना घडल्यास प्रत्युत्तरादाखल करण्याची कारवाई आणि बायडन आणि इतर प्रमुख व्यक्तींच्या सुरक्षा याबाबत अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे रयान यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या