
सामना ऑनलाईन । मुंबई
ट्रेनमध्ये असलेल्या गर्दीचा फायदा घेऊन अश्लील चाळे करत तरुणीचा विनयभंग करणाऱ्या विकृताला जमावाने चोप दिल्याची घटना घडली आहे. अविजित सिंग (29) असं या तरुणाचं नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी ही तरुणी आणि तिचे कुटुंबीय विरार इथून देवदर्शन करून परतत होते. ते ज्या ट्रेनमध्ये चढले त्या ट्रेनमध्ये हळुहळू गर्दी वाढली होती. रेल्वेने बोरीवली स्थानक सोडल्यानंतर तरुणीला मागून कुणीतरी स्पर्श करत असल्याची जाणीव झाली. मात्र, गर्दी पुष्कळ असल्याने तिला मागे वळून बघता आलं नाही. ट्रेन जोगेश्वरी स्थानकाजवळ आल्यानंतर तिला पुन्हा स्पर्शाची जाणीव झाल्याने तिने वळून पाहिलं. तेव्हा अविजित त्याच्या पँटची चेन उघडून तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत असल्याचं तिच्या लक्षात आलं.
ते पाहून तरुणीने आरडाओरडा करायला सुरुवात केली. तिच्या ओरड्यामुळे तिथे असलेल्या इतर प्रवाशांनी अविजितला पकडलं आणि चोपायला सुरुवात केली. यानंतर त्यांनी अंधेरी स्थानकात त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. अविजित हा नालासोपारा येथील रहिवासी असून तो बेरोजगार आहे. रविवारी विरार स्थानकापासून त्याने या तरुणीचा पाठलाग केल्याचंही तरुणीने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.
summary- pervert got beaten up by train commuters




























































