दरवाढीचे चटके, सलग पाचव्या दिवशी पेट्रोल-डिझेल महागले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रचंड उकाडय़ाचा महिना मानल्या जाणाऱया ऑक्टोबरमध्ये गरमीचे कमी आणि इंधन दरवाढीचेच अधिक चटके बसत आहेत. रविवारी सलग पाचव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा भडका ‘जैसे थे’ राहिला. मुंबईत प्रतिलिटर पेट्रोलच्या दरात 34 पैशांची, तर डिझेलच्या दरात 38 पैशांची वाढ झाली. त्यामुळे पेट्रोल 113.46 रुपयांवर आणि डिझेल 104.38 रुपयांवर पोहोचले आहे.

देशात गेल्या काही दिवसांत इंधन दरवाढीचा नवनवा विक्रम नोंद होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्चा तेलाच्या वाढत्या किमतीमुळे इंधनाचे भाव गगनाला भिडले आहेत. पेट्रोलियम कंपन्यांनी रविवारी सलग पाचव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले. सततच्या दरवाढीमुळे मागील 18 महिन्यांत पेट्रोल जवळपास 36 रुपयांनी आणि डिझेल 26.58 रुपयांनी महागले आहे. रविवारी राजधानी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रत्येकी 35 पैशांची वाढ झाली.