1983 साली कपिल देवच्या नेतृत्त्वात खेळणाऱ्या हिंदुस्थानच्या क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकून इतिहास रचला होता. आता त्या ऐतिहासिक मॅचवर दिग्दर्शक कबीर खान '83' हा चित्रपट तयार करत आहेत.
या चित्रपटात कपिल देवची भूमिका रणवीर सिंग साकारत आहे.
संदीप पाटीलची भूमिका त्यांचाच मुलगा चिराग पाटील करणार आहे.
गोलंदाज बलविंदर सिंग संधू यांची भूमिका पंजाबी अभिनेता गायक अॅमी विर्क साकारणार आहे.
सय्यद किरमानीच्या भूमिकेसाठी युट्यूबर साहील खट्टर याची निवड झाली आहे.
श्रीकांतची भूमिका तमिळ अभिनेता जीवा साकारणार आहे.
अभिनेते पंकज त्रिपाठी या चित्रपटात 1983 च्या टिमचे मॅनेजर मान सिंग यांची भूमिका करणार आहेत.