
निसर्गातली चमत्कार हे अद्भूत असतात. अशक्य वाटणारी आणि दुर्मिळ अशी आश्चर्यं निसर्गात घडतात. इंडोनेशियात उगवणारं एक फूलही याचीच साक्ष देतं.

मूळचं इंडोनेशिया इथलं असलेलं हे फूल काहीसं विचित्र आकाराचं असतं. मानवी गुप्तांगाचा आकार असल्याने या रोपट्याला पेनिस प्लांट असं म्हटलं जातं. दर 24 वर्षांनी फुलणारं हे फूल प्रथमच नेदरलँड्समध्ये फुललं आहे.

या फुलाला अतिशय तीव्र असा दुर्गंध असतो. एखाद्या सडलेल्या मृतदेहाला यावा अशी याची दुर्गंधी असते. याचं शास्त्रीय नाव अमोर्फोफॅलस डिकस सिल्वे असं आहे. उष्ण प्रदेशात हे फूल आढळतं.

साधारण एक आठवड्यात हे फूल पूर्णपणे उमलतं. याची उंचीही मानवी उंचीहून जास्त असते. यापूर्वी ते 1997 मध्ये फुललं होतं.


































































