Photo – सावळ्या विठुरायाला पाहण्यासाठी पंढरपुरात भक्तांचा महासागर

आषाढी शुद्ध एकादशीनिमित्त सावळ्या विठुरायाच दर्शन घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपुरमध्ये दाखलं झाले आहेत.  

संपूर्ण पंढरपूर भक्तीमय वातावरणात नाहून निघालं आहे.

ऊन, वारा पाऊस अंगावर झेलत लहाणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण पायवारी करत हरिनामाच्या गजरात पंढरपुरमध्ये पोहोचले आहेत.

‘अवघे गर्जे पंढरपूर चालला नामाचा गजर’ या संत उक्तीप्रमाणे अवघी पंढरी वारकरी भाविकांनी फुलून गेली आहे.  

आषाढी शुद्ध एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक तसेच मानाचे वारकरी कैलास दामु उगले, कल्पना कैलास उगले यांच्या समवेत केली.