
राज्यातील फिजिओथेरपी आणि व्यवसायोपचार (ऑक्युपेशनल थेरपी) पदव्युत्तर पदवी तसेच बी.एस्सी. नार्ंसगच्या विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात भरघोस वाढ करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. फिजियोथेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपीच्या विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात 1 जून 2025 पासून दहा हजार रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे. मूळ वेतन, महागाई भत्ता व झालेली वाढ मिळून आता हे विद्यावेतन दरमहा 33 हजार 730 रुपये इतके असेल. त्यासाठी 67 लाख 20 हजार रुपयांच्या तरतुदीलाही मान्यता देण्यात आली. गेल्या 23 वर्षांपासून या विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढ करण्यात आलेली नव्हती.