‘मोदी काय करतील हे माहिती नाही’, पवारांच्या वक्तव्यावर पंतप्रधानांचा टोला

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यातील मतदान 23 एप्रिलला पार पडणार आहे. रविवारी तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचारतोफा थंडावणार आहेत. तिसऱ्या टप्प्यात गुजरातमध्ये 26 जागांसाठी मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी गुजरातमधील पाटण येथे सभा घेतली. या सभेत मोदींनी शरद पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

… तर पाकिस्तानसाठी ती ‘काळरात्र’ ठरली असती, मोदींचा घणाघात

पंतप्रधान मोदी काय करतील हे माहिती नाही, मी खूप घाबरलेलो आहे, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. या वक्तव्याबाबत बोलताना मोदी म्हणाले की, शरद पवार म्हणतात मला माहित नाही मोदी काय करतील. जर यांना माहिती मोदी उद्या काय करणार आहेत, तर इम्रान खान यांना कसे माहिती होणार? असा टोला त्यांनी लगावला.

काय म्हणाले होते पवार?
बारामतीमधील एका प्रचार रॅलीला संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले होते की, मोदी म्हणतात की ते माझे बोट पकडून राजकारणामध्ये आले आहेत. परंतु आता मी घाबरलो आहे, कारण हा माणूस काय करेल हे कोणीच सांगू शकत नाही.