
जिल्ह्या-जिल्ह्यांत कोरोना नियंत्रणात आल्यास देशभरातील संसर्ग नियंत्रणात येईल. त्यामुळे कोरोना रोखण्यासाठी जे करता येईल ते करा, अशी सूचना करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिल्हाधिकाऱयांना फ्री हॅण्ड दिला आहे. दरम्यान, लसींचा पुरवठा मोठय़ा प्रमाणावर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मंगळवारी दिल्ली, बिहार, आसाम, कर्नाटक, तामिळनाडू, मध्यप्रदेश, उत्तराखंड, हिमाचलप्रदेश, चंदीगड आणि गोवा या दहा राज्ये आणि पेंद्रशासित प्रदेशातील जिल्हाधिकाऱयांशी संवाद साधला. 46 जिल्हाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
पंतप्रधान काय म्हणाले?
- आपल्या देशात जेवढे जिल्हे आहेत तेवढी आव्हानेदेखील आहेत. जिह्यातील आव्हाने, परिस्थिती तुम्हालाच चांगली समजते. तुमच्या काही सूचना असतील तर त्या विनासंकोच मांडा. माझ्याकडून तुम्हाला पूर्ण सूट आहे.
- कोरोना रोखण्यासाठी जे काही करता येईल ते जिल्हाधिकाऱयांनी करावे. जेव्हा जिल्हा जिंकतो तेव्हा देश जिंकतो. जिह्या-जिह्यांत कोरोना नियंत्रणात येईल तेव्हा देशातील कोरोना संसर्ग नियंत्रणात येईल. सामूहिक प्रयत्नांनी ही लढाई लढावी लागणार आहे.
- कोरोनाशी लढण्यासाठी लसीकरण हे प्रभाव माध्यम आहे. लसींचा पुरवठा मोठय़ा प्रमाणावर व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.



























































