स्वच्छतेत मुंबईच देशात सर्वोत्तम, पंतप्रधानांच्या हस्ते गौरव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

‘स्वच्छता सर्वेक्षणा’त मुंबई महानगरपालिका देशात ‘सर्वोत्तम’ ठरली आहे. हा बहुमान पटकावल्याबद्दल मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये आयोजित केलेल्या दिमाखदार सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या पुरस्कारामुळे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

‘स्वच्छता सर्वेक्षणा’त देशातील राजधान्यांच्या गटात मुंबई महापालिका सर्वोत्तम ठरली. हा पुरस्कार वितरण सोहळा इंदूरमधील नेहरू स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला होता. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याप्रसंगी पालिका आयुक्त अजोय मेहता, अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल उपस्थित होते.