
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांचे गुरुवारी हिंदुस्थानच्या दोन दिवसांच्या दौऱयावर येथे आगमन झाले. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी त्यांचे दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वागत केले. यानंतर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आग्रहाचे आमंत्रण स्वीकारत त्यांच्यासोबत रात्रीचे भोजन घेतले. तत्पूर्वी मोदी यांनी आपल्या निवासस्थानी पुतिन यांच्याशी हस्तांदोलन करीत त्यांची गळाभेट घेतली.
दरम्यान, मोदी-पुतिन यांच्यात उद्या शुक्रवारी द्विपक्षीय चर्चा होणार आहे. या चर्चेत एस-400 या मिसाईल डिफेन्स सिस्टीम कराराला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. यामुळे चीनच्या चार हजार कि.मी.च्या विस्तीर्ण सीमेवर नजर ठेवणे शक्य होणार आहे. या करारामुळे अमेरिकेने हिंदुस्थानवर निर्बंध आणण्याची धमकी दिली आहे. त्याची पर्वा न करता मिसाईल डिफेन्स सिस्टीमचा करार उद्या रशियाबरोबर होण्याची शक्यता आहे.






























































