पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑलिम्पियनना भेटले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणाऱया खेळाडूंची भेट घेतली. नरेंद्र मोदी यांनी हिंदुस्थानच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेल्या भाषणात टोकियो ऑलिम्पिकमध्ये सात पदकांसह ऐतिहासिक कामगिरी करणाऱया हिंदुस्थानी खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक केले होते. सोमवारी त्यांच्यासोबत ब्रेकफास्ट केला.

नरेंद्र मोदी यांनी यावेळी पी. व्ही. सिंधूला दिलेले वचनही पूर्ण केले. टोकियो ऑलिम्पिकआधी नरेंद्र मोदी व पी. व्ही. सिंधू यांच्यामध्ये संवाद झाला होता. त्यावेळी पी. व्ही. सिंधू हिने आईस्क्रीमची प्रचंड आवड असल्याचे त्यांना सांगितले होते. पण ऑलिम्पिकसाठी कसून सराव व डाएट करीत आहे. त्यामुळे आईस्क्रीमपासून दूरच आहे, असेही ती म्हणाली होती.


त्याप्रसंगी नरेंद्र मोदी यांनी पी. व्ही. सिंधू हिला टोकियो ऑलिम्पिकनंतर दोघे एकत्रितपणे आईस्क्रीम खाऊ असे वचन दिले होते. नरेंद्र मोदी यांनी सोमवारी ते वचन पूर्ण केले. नरेंद्र मोदी यांनी पी. व्ही. सिंधू हिच्यासोबत एकत्रितपणे आईस्क्रीम खाल्ले.