
इंटेलिजन्स ब्युरोच्या (IB) गोपनीय अहवालानंतर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच कॉक्रोच जनता पार्टीचे सोशल मीडिया अकाऊंट ब्लॉक केले असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केला आहे. भंडारा येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा आरोप केला आहे.
नाना पटोले यांनी दावा करत म्हटले आहे की, “देशात जनतेचा मोठा उद्रेक होऊ शकतो, अशी माहिती आयबीने पंतप्रधानांना दिली होती आणि हा संभाव्य जनक्षोभ टाळण्यासाठीच तातडीने हे अकाऊंट ब्लॉक करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र केवळ कॉक्रोच जनता पार्टीचे अकाऊंट बंद करून हा प्रश्न सुटणार नाही, असेही ते म्हणाले.
जनतेच्या मनात जो तीव्र संताप आणि राग खदखदतोय, तो हे सरकार अशा प्रकारे दडपून कमी करू शकत नाही. या सरकारने देश विकला आहे, अशी बोचरी टीका ही यावेळी नाना पटोले यांनी केली.






























































