देशांततर्गत सुरक्षेबाबत तडजोड नाही, राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत पंतप्रधानांनी अधिकार्‍यांना  केले मार्गदर्शन

428

सीमेपलीकडील शत्रूंकडून देशांतर्गत सुरक्षेला आव्हान देण्यात येत आहे. त्यामुळे देशांतर्गत सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. बाह्य आक्रमण अणि छुप्या कारवायांचे आव्हान पेलण्यास आपल्या देशातील तपास यंत्रणा सक्षम असल्याचा विश्वास  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. तर, सीमेपलीकडील दिल्या जाणार्‍या आव्हानालाही चोख प्रत्युत्तर देण्याचे मोदींनी शत्रुराष्ट्रांना ठणकावले.

पुण्यातील पाषाण रस्त्यावरील ‘आयसर’ (भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था) येथे पोलीस महासंचालकांची राष्ट्रीय पातळीवरील सुरक्षा परिषद सुरू आहे. आज पंतप्रधान मोदी यांनी मार्गदर्शन केले. या परिषदेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार दत्ता पडसलगीकर यांच्यासह 180 वरिष्ठ पोलीस आणि सुरक्षा अधिकारी उपस्थित आहेत. तंत्रज्ञानातील बदलांवर तसेच देशांतर्गत सुरक्षेवर परिषदेत चर्चा केली जाणार आहे.

सेना ध्वजनिधीचे संकलन

पोलीस महासंचालकांच्या परिषदेसाठी मार्गदर्शन करण्यापूर्वी  पंतप्रधान मोदी यांनी राजभवनात सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलनाचा शुभारंभ केला. यावेळी जम्मू-कश्मीरात दहशतवाद्यांशी लढताना 2016 मध्ये शहीद झालेले मेजर कुणाल गोसावी यांच्या वीरपत्नी उमा आणि मुलगी उमंग यांच्याशी पंतप्रधान मोदी यांनी संवाद साधला.

आपली प्रतिक्रिया द्या