
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या बांग्लादेश दौऱ्यावर आहेत. बांग्लादेशच्या स्वातंत्र्याच्या 50 वा वर्धापन दिनानिमित्त त्यांना निमंत्रण देण्यात आले होते. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी अनेक कार्यक्रमात सहभागी होणार असून विरोधी पक्षांचीही भेट घेणार आहेत. तुम्ही या अभिमानाच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिले. त्यासाठी मी आभार मानतो, असे मोदी यावेळी म्हणाले.
आपण बांग्लादेशच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालो होतो. त्यासाठी आपल्याला अटकही झाली होती, असे मोदी यांनी ढाकामध्ये आयोजित एका कार्यक्रमात सांगितले. बांग्लादेशच्या स्वातंत्र्यासाठी झालेल्या संघर्षात सहभागी होणे, ही आपल्या आयुष्यातील आंदोलनांपैकी महत्त्वाचे एक आंदोलन होते. त्यावेळी आपण 20-22 वर्षांचे होतो. त्या काळात सहकाऱ्यांनी बांग्लादेशच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला होता. त्यात आपणही सहभागी झालो होतो, असे त्यांनी सांगितले.
I would like to remind brothers & sisters in Bangladesh with pride, being involved in the struggle for independence of Bangladesh was one of first movements of my life. I must have been 20-22 years old when I&my colleagues did Satyagraha for Bangladesh’s freedom: PM Modi in Dhaka pic.twitter.com/f6O68ldPfn
— ANI (@ANI) March 26, 2021
बांग्लादेशच्या स्वातंत्र्यलढ्यात शहीद झालेल्या हिंदुस्थानी सैनिकांनी त्यांनी श्रद्धाजंली अर्पण केली. बांग्लादेशच्या स्वातंत्र्यलढ्यात दोन्ही देशांच्या सैनिकांचे रक्त सांडले आहे. त्यामुळे दोन्ही देशांचे संबंध दृढ आहेत., असे मोदी म्हणाले. शहीद स्मारकालाही त्यांनी भेट दिली. त्यांचा संघर्ष आणि बलिदान आपल्यासाठी प्रेरणादायक आहे. धर्माचे रक्षण आणि अन्यायाविरोधातील लढ्यासाठी त्यांनी प्राणांची आहुती दिली, अशा शब्दांत पंतप्रधानांनी त्यांना श्रद्धाजंली वाहिली.
At the National Martyrs’ Memorial, paid homage to the valorous martyrs of Bangladesh. Their struggles and sacrifices are inspiring. They devoted their life towards preserving righteousness and resisting injustice.
Also planted an Arjuna Tree sapling. pic.twitter.com/medgw2TT1i
— Narendra Modi (@narendramodi) March 26, 2021
पंतप्रधान मोदी यांनी शेख मुजीबुर रहमान यांना मरणोत्तर गांधी शांती पुरस्काराने सन्मानित केले. त्यांनी पंतप्रधान शेख हसीना यांच्याकडे हा पुरस्कार सपूर्द करून शेख मुजीबुर रहमान यांच्या आठवणींना उजाळा दिला. आपण सर्व हिंदुस्थानच्या वतीने शेख मुजीबुर रहमान यांना श्रद्धांजली अपर्ण करतो. पंतप्रधान मोदी म्हणाले, दोन्ही देशांचे संबंध दृढ होत आहेत. हा सन्मान देताना मला अत्यंत आनंद होत आहे, असेही मोदी म्हणाले.
या दौऱ्यात पंतप्रधानांनी बांग्लादेशातील हिंदुस्थानी समुदायाच्या नागरिकांशी संवाद साधला. तसेच वोहरा समाजाच्या लोकांचीही त्यांनी भेट घेतली. त्यांच्याशी पंतप्रधानांनी गुजरातीत संवाद साधला. अनेक प्रोटोकल असूनही मोदी यांनी आपल्याशी संवाद साधल्याने आनंद झाल्याचे वोहरा समाजातील अनेकांनी सांगितले.



























































