जेटची नोकरी गेली, खात्यातले पैसेही अडकले; धसक्याने खातेदाराचा मृत्यू

471
pmc bank holder died

काही महिन्यांपूर्वी जेट एअरलाइनची नोकरी गेली, त्यातच पीएमसी बँकेत ठेवलेली लाखोंची बचत अडकली. त्यामुळे घरखर्च कसा चालवावा याच्या धसक्याने ओशिवर्‍यात एका खातेदाराचा मृत्यू झाला.

ओशिवर्‍यात राहणारे संजय गुलाटी (51) हे जेट एअरवेजमध्ये कामाला होते. जेटला टाळे  लागल्यामुळे संजय यांची नोकरी गेली होती. नोकरीतून त्यांना मिळालेली 90 लाखांची बचत पीएमसीच्या ओशिवरात शाखेत ठेवली होती. त्याच्यातून येणार्‍या व्याजातून त्यांच्या कुटुंबीयांचा घरखर्च सुरू होता. मात्र, घोटाळ्यानंतर मिळणार्‍या तुटपुंज्या पैशातून घरखर्च चालवणे कठीण झाले होते. त्यांनी काल मुंबईतील आझाद मैदानात पीएमसी खातेदारकांच्या निदर्शनात भाग घेतला होता. निदर्शनावेळी अनेक खातेदारांच्या व्यथा त्यांनी जवळून पाहिल्या. त्यानंतर ते घरी आले. घरी जेवत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या