
कष्टकऱ्यांची बँक पंजाब ऍण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बँकेतील घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी दोन संचालकांना अटक केली आहे. एकूण 6500 कोटींचा हा घपला असण्याचा अंदाज आहे.
गुरुवारी पोलिसांनी पीएमसी बँकेचे संचालक सारंग वाधवान आणि राकेश वाधवान यांना अटक केली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने या दोघांना अटक केली आहे. याआधी पंजाब अँड महाराष्ट्र बँकेतील गैरव्यवहारप्रकरणी सोमवारीर आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आरबीआयच्या रिझर्व्ह बँकेच्या आदेशावरून सजबीरसिंग मठ्ठा यांच्या तक्रारीवरून पीएमसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस, चेअरमन वरियम सिंग व बँकेचे इतर पदाधिकारी तसेच एचडीआयएल कंपनीचे संचालक वाधवा यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.
PMC Bank matter: Housing Development Infrastructure Limited (HDIL) Directors, Sarang Wadhawan and Rakesh Wadhwan, accused of default, have been arrested by Economic Offence Wing. More details awaited. pic.twitter.com/IvcNHc7wA7
— ANI (@ANI) October 3, 2019
हायकोर्टात याचिका
रिझर्व्ह बँकेने पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर (पीएमसी) आर्थिक अनियमिततेमुळे निर्बंध घातले आहेत. या कारवाईमुळे पीएमसी बँकेच्या ठेवीदारांचे हाल होत असून याप्रकरणी ठेवीदारांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. खातेदारांच्या हिताचा विचार करून पैसे काढण्याची मर्यादा हटविण्यात यावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली असून लवकरच या याचिकेवर सुनावणी होणार आहे. सामाजिक संस्था कन्झ्युमर ऍक्शन नेटवर्क (कॅन) च्या वतीने न्यायालयात आज जनहित याचिका दाखल करण्यात आली. रिझर्व्ह बँकेने नुकतेच पीएमसी बॅकेवर आर्थिक अनियमिततेचे कारण देऊन निर्बंध घातले आहेत. यामुळे पीएमसी खातेदारांवर उपासमारीची वेळ येणार आहे. म्हणूनच लवकरात लवकर आरबीआयने हे निर्बंध हटवावे, त्याचबरोबर अशा बँकांबाबत रिजर्व्ह बॅकेने एक समिती नेमावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

























































