
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पंजाब नॅशलन बँक घोटाळ्यातील आरोपी असलेला हिरे व्यापारी आणि गितांजली समूहाचा प्रमुख मेहुल चोक्सी याच्या प्रत्यर्पणाच्या दिशेन हिंदुस्थान महत्वाची पावले उचलत असतानाच त्याच्या वकिलांनी तांत्रिक डावपेच खेळले आहे. त्याने हिंदुस्थानचे नागरिकत्व सोडले आहे. ज्यामुळे त्याच्या प्रत्याप्रणात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. मोदी सरकारसाठी हा मोठा झटका मानला जात आहे.
हिंदुस्थानचे नागरिकत्त्व सोडण्यासाठी चोक्सीला 177 अमेरिकी डॉलर्सचा ड्राफ्ट जमा करावा लागला आहे. आपण नियमांच्या अधीन राहूनच एंटीगाचे नागरिकत्त्व घेतले असून हिंदुस्थानचे नागरिकत्त्व सोडले आहे, अशी माहिती चोक्सीने उच्चायुक्तालयाला दिली आहे.
Sources: Mehul Choksi has surrendered his Indian passport to High Commission in Guyana. Whenever an Indian citizen acquires foreign nationality he’s expected to surrender his Indian passport. India continues to pursue Choksi’s return with Antigua through diplomatic&legal channels pic.twitter.com/3DSLeHvovh
— ANI (@ANI) January 21, 2019
मेहुल चोक्सीने एंटीगा उच्चायुक्तालयात सोमवारी हिंदुस्थानचा पासपोर्ट जमा केला. पंजाब नॅशनल बँकेत 14 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. हा घोटाळा उजेडात येण्यापूर्वीच चोक्सी हिंदुस्थानातून बाहेर पडला होता. याच प्रकरणात चोक्सीचा भाचा नीरव मोदी हा देखील आरोपी आहे. चोक्सीच्या या नव्या चालीनंतर आता सरकार कोणती पावले उचलणार हे महत्वाचे ठरणार आहे.

























































