पोकलेन अंगावर पडल्याने कचरावेचक तरुणाचा जागीच मृत्यू

प्रातिनिधीक फोटो

कचरा डेपोमधील पोकलेन कोसळल्याने कचरावेचक तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना रामटेकडी परिसरातील कचरा डेपोत घडली आहे. शाहबाज शेख ( वय 24, रा. हडपसर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोकलेनचालक रुपेश कुमार (वय 21, रा. रामटेकडी, हडपसर) याच्याविरोधात वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहबाज रामटेकडी इंडस्ट्रीज एरियाच्या कचरा डेपोत मंगळवारी कचरा वेचत होता. त्यावेळी दुपारी 1.15  वाजण्याच्या सुमारास रुपेश कचरा ढिगाऱ्यावर पोकलेन चालवित होता. रुपेशने उंच असलेल्या ढिगाऱ्यावर पोकलेन चढविल्यामुळे पोकलेन खाली पडला. त्यामुळे पोकलेनची बकेट लागून शाहबाज गंभीररीत्या जखमी झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी वानवडी पोलीस तपास करीत आहेत.

 

आपली प्रतिक्रिया द्या