डॉ. सायरस मेहता यांचा ‘प्रीस्बॅमेनीया’ पुरस्काराने गौरव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। पोलंड

डॉ. सायरस मेहताज् इंटरनॅशनल आय सेंटरचे प्रमुख शल्य विशारद तसेच व्हीजन व्हिस्टा आय क्लिनिक प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक डॉ. सायरस मेहता यांना ‘प्रीस्बॅमेनीया’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

पोलंडमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय पॉलीश ऑप्थॅल्मिक काँग्रेसमध्ये त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. मोतीबिंदू शस्त्रक्रियेसंबंधित त्यांनी केलेल्या संशोधनाबाबत त्यांना सन्मानित करण्यात आले. अशा प्रकारचा पुरस्कार मिळवणारे डॉ. मेहता हे पहिले हिंदुस्थानी आहेत.