
घाटकोपर पूर्व रेल्वे स्टेशन स्कायवॉकवर पोलीस हवालदार विलास राजे (54) बेशुद्ध अवस्थेत आढळले. मुख्य नियंत्रण कक्षातून कॉल आल्यानंतर पंतनगर पोलीस घटनास्थळी पोहोचले व त्यांनी त्या व्यक्तीला राजावाडी इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. हवालदार विलास राजे सशस्त्र पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. मागील काही दिवसापासून ते कामावरदेखील गैरहजर राहत होते. राजे यांच्या कुटुंबीयांनी ते हरविल्याची तक्रार पोलिसांत दिली होती.


























































