समुद्रकिनाऱ्यावर पोलीस सतर्क , दापोली पाठोपाठ गणपतीपुळे किनाऱ्यावर गस्त

दापोलीतील समुद्र किनाऱ्यापाठोपाठ गणपतीपुळे येथील समुद्र किनारी आज पोलिसांनी गस्त घालून पर्यटकांना सूचना दिल्या.अलीकडे समुद्र किनाऱ्यावर वाहने नेऊन स्टंटबाजी करण्याचे प्रकार वाढले आहेत.त्यामुळे पोलीस दल सतर्क झाले आहेत.

शनिवारी दापोली तालुक्यातील हर्णे समुद्रकिनारी स्टंटबाजी करणाऱ्या चारचाकी वाहनावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.आज रविवार असल्याने गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर पर्यटक आणि भाविकांची गर्दी वाढली होती.त्यामुळे गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर पोलिसांना कडक बंदोबस्त ठेवला होता.