सिंहगड रस्त्यावर पोलिसाला मारहाण

53
फोटो प्रातिनिधीक

सामना ऑनलाईन, पुणे

शहरात पोलिसांवरील हल्ले सतत वाढत असून, सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी असलेले पोलीस असुरक्षित असल्याचे घटनांवरून स्पष्ट झाले आहे. मोटारीला क्रमांक नसल्याने संशय आल्याने संबंधितांकडे चौकशी करण्यासाठी गेलेल्या बीट मार्शल कर्मचाऱ्याला तिघा तरुणांनी मारहाण केली. ही घटना रविवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील हॉटेल निखाराजवळ घडली.

पोलीस नाईक एस.एस तनपुरे यांनी याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. काल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास तनपुरे साथीदारासह सिंहगड परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी निखाला हॉटेलजवळ त्यांना एका मोटारीला क्रमांक नसल्याचे त्यांना दिसून आले. त्यामुळे त्यांनी जवळ जाऊन संबंधित मोटारीत बसलेल्या तिघांना विचारणा केली असता, तिघांनी मिळून तनपुरे यांना मारहाण केली. त्यामुळे त्या तरुणांना अभिरूची पोलीस चौकीत नेण्यासाठी नपुरे त्यांच्या मोटारीत बसले. या तिघा तरुणांनी मोटार पुणे-मुंबई महामार्हाच्या दिशेने बावधनकडे नेली. तिघांनी तनपुरेंना वावधन ब्रीजवरून खाली फेकून देण्याची धमकी देत शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांनी तनपुरेंना बावधन परिसरात सोडून पळ काढला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शिवदास गायकवाड अधिक तपास करत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या