
रत्नागिरीतील झाडगाव येथील एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर बेकायदेशीररित्या बिगर परवाना चालणाऱ्या जुगाराच्या अड्ड्यावर पोलीसांनी छापा घातला आहे. याठिकाणी तीनपत्ती जुगारखेळ खेळला जात होता. पोलीसांनी केलेल्या कारवाईत 6 लाख 60 हजार 200 रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
झाडगाव लघुउद्योग परिसरात शहर पोलीसांनी ही कारवाई केली. या कारवाईत प्रितम घोसाळे, राजेश कोळेकर, प्रशांत महाजन, अमोल शेट्ये, दयानंद गुरव, देवानंद सुर्वे या संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत 1 स्विफ्ट डिझायर गाडी, 1 सुमोगाडी, 22 हजार 200 रुपयांची रोकड आणि 4 मोबाईलसह अन्य साहित्य जप्त केले आहे.




























































