
सत्र न्यायालयात न्यायप्रविष्ट असलेल्या गुह्यातून दोषमुक्त करण्यासाठी आरोपीकडे पाच लाखांची मागणी करून तडजोडीअंती 50 हजारांची लाच घेताना आज अतिरिक्त पोलीस अभियोक्ता रंगेहाथ ट्रॅप झाला. मंगेश आरोटे असे त्याचे नाव आहे.
किरण (नाव बदललेले) याच्या विरोधात दाखल गुन्हा सत्र न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. सदर गुन्ह्यातून दोषमुक्त होण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. त्या गुह्यातून दोषमुक्त करण्यासाठी मंगेश आरोटे याने किरणकडे पाच लाखांची मागणी केली. तडजोडीअंती 50 हजार स्वीकारण्याचे ठरले. पण लाच द्यायची नसल्याने किरणने ऍण्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार केली. त्यानुसार आज 50 हजारांची लाच घेताना आरोटेला रंगेहाथ पकडण्यात आले.
























































